

Jharkhand Opposes MMDR Act Amendment Assembly Resolution Warns of 13000 Crore Annual Financial Loss to State Revenue
esakal
केंद्र सरकारच्या सुधारित 'माइन्स अँड मिनरल्स (डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन) (MMDR) कायद्याविरोधात झारखंड विधानसभेने गुरुवारी (२६ नोव्हेंबर २०२६) शासकीय ठराव संमत केला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा ठराव मांडला. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्याला दरवर्षी सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागू शकते, असा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारने या दुरुस्तीचा पुनर्विचार करून ती मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.