Naxal Attack: मोठी बातमी! झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, दोन जवान जखमी, एक शहीद
Chaibasa IED Blast: चाईबासा झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील छोटानागरा पोलीस स्टेशन परिसरातील मारंगपोंगा परिसरात आयईडी स्फोट झाला. यामध्ये सीआरपीएफचे जवान जखमी झाले.
झारखंडमधील चाईबासा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफ १९३ बटालियनच्या उपनिरीक्षकासह दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रांचीला विमानाने नेण्याची तयारी करण्यात आली. उपनिरीक्षक सुनील कुमार मंडल यांचे निधन झाले.