

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital
sakal
झारखंड: आयुष उपचारपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत झारखंडला आयुष क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. रांची येथील पलाश भवनात आयोजित ‘प्रदेश आयुर्वेद संमेलना’त आरोग्यमंत्री डॉ. इरफान अन्सारी यांनी राज्यात ९०० कोटी रुपयांच्या खर्चातून जागतिक दर्जाचे ‘आयुष मेडिकल कॉलेज हॉस्पिटल’ उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.