

Jharkhand Bus Accident
ESakal
झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआतांड पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिक जण जखमी झाले. बस उलटल्याने हा अपघात झाला. प्रवासी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होते. मोठ्या संख्येने जखमींना रुग्णालयात आणले जात आहे. महुआतांड येथील सरकारी रुग्णालय जखमींनी भरले आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.