

goat farming subsidy jharkhand government
sakal
झारखंड: ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी झारखंड सरकारने ‘मुख्यमंत्री पशुधन विकास योजने’अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक शेळीपालन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १०० शेळ्या आणि ५ बोकड क्षमतेचा व्यावसायिक फार्म उभारण्यासाठी सरकारकडून प्रकल्प खर्चाच्या ७० टक्के थेट अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील ४३७ पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पशुसंवर्धन (नियोजन व प्रशिक्षण) विभागाचे सहसंचालक डॉ. विपिन महथा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील तरुणांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि मांस उत्पादनाला चालना देणे हा या योजनेमागील उद्देश आहे.