Jharkhand Doctors Retirement Age : कोरोना काळातील वाढीव निवृत्ती वय पूर्ववत; दोन वर्षांनंतर ६५ वर्षांचा नियम लागू

Jharkhand Government Restores Doctors' Retirement Age to 65 : झारखंडमध्ये गैर-शैक्षणिक आणि तज्ज्ञ शासकीय डॉक्टरांचे निवृत्ती वय पुन्हा ६५ वर्षे करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Jharkhand Doctors Retirement Age

Jharkhand Doctors Retirement Age

esakal

Updated on

झारखंडमध्ये गैर-शैक्षणिक आणि तज्ज्ञ शासकीय डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६७ वर्षांवरून पुन्हा ६५ वर्षे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन निवृत्तीचे वय ६५ वरून ६७ वर्षे करण्यात आले होते. आता ही वाढीव वयोमर्यादा पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, आरोग्य विभागाने यासंदर्भात अधिकृत संकल्प जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com