२५ वर्षापूर्वी १०वी पास झालेल्या शिक्षणमंत्र्यांचा ११वीला प्रवेश

Jharkhand education minister enrols in Class 11 says no age limit to learning
Jharkhand education minister enrols in Class 11 says no age limit to learning

डुमरी (झारखंड) : झारखंडचे (Jharkhand) शिक्षणमंत्री जगरनाथ महतो (HRD Minister Jagarnath Mahto) यांनी आपल्या डुमरी विधानसभा मतदारसंघातील एका सरकारी महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला आहे. (Jagarnath Mahto enrolled in Class 11) ५३ वर्षाच्या महतो यांनी २५ वर्षापूर्वी १९९५मध्ये १०वीची परिक्षा दिली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महतो म्हणाले, 'माझ्या शिक्षणावरून सातत्याने चर्चा होत असे, याचा विचार करुन मी पुढे शिकण्याचा विचार केला आहे. मी जेव्हांपासून मानव संसाधन विकास (एचआरडी) मंत्री म्हणून नियुक्त झालो आहे, तेव्हांपासून सातत्याने माझ्या शिक्षणावरून चर्चा होत राहिली आहे. काही नविर्वाचित आमदारांसह सामान्य जनताही यावर सातत्याने चर्चा करत असल्याचे निदर्शनास आल्याचे महतो यांनी सांगितले आहे.

 

जगरनाथ महतो यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून ट्विट केला असून त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, 'मी स्वतः सुधारून सुरुवात केली आहे. दहावी पास झाल्यानंतर काही गोष्टींमुळे मी शिक्षणापासून दूर गेलो, परंतु आज परत शिक्षण घेण्याची संधी निर्माण झाली असून मी त्याला आज ११वीत प्रवेश घेऊन सुरुवात केली आहे. 

जगरनाथ महतो आर्ट्स शाखेतून अकरावीला प्रवेश घेतला आहे. ते पुढे राजकिय विषयांचा अभ्यास करतील असेही सांगण्यात येत आहे. महतो यांनी सांगितले की, मी आधीही सांगितले आहे आणि आताही सांगतो की शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट नसते. मी ज्या दिवशी राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली, त्या दिवशी १० वी पास शिक्षणमंत्री काय करणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता, परंतु, मीही शिकणार आणि राज्यातील मुलांनाही शिकवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com