रांची : झारखंडचे शिक्षणमंत्री रामदास सोरेन आज (शनिवार) सकाळी त्यांच्या निवासस्थानातील बाथरूममध्ये पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या (Jharkhand Education Minister Ramdas Soren) मेंदूला दुखापत होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारांसाठी एअर अँब्युलन्सने दिल्लीला हलवण्यात आले आहे.