
Jharkhand Elephants
sakal
रांची : झारखंडमध्ये हत्तींच्या संख्येत मोठी घट झाली असून ती २०१७ मधील ६७८ वरुन २१७ पर्यंत घसरली आहे. देशात प्रथमच केलेल्या डीएनए आधारित गणनेद्वारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हत्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याने वन्यजीव तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला असून हत्ती-मनुष्यातील वाढता संघर्ष याला कारणीभूत असल्याचेही म्हटले आहे.