14th JPSC Exam Cancellation
esakal
झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप, रखडलेल्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेत बदल करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी गेल्या काही काळापासून आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. आज विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यात बैठक पार पडली. यावेळी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.