

Hemant Soren Seeks New Jharkhand High Court Chief Justice
esakal
रांची : झारखंड उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती एम. एस. सोनक हे २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती वेळेत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला पत्राद्वारे केली आहे. उच्च न्यायालयात वारंवार प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नेमण्याची वेळ येत असल्याने प्रशासकीय सातत्य आणि संस्थात्मक नियोजनावर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पूर्णवेळ मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी केली असून, न्यायालयाच्या कामकाजात स्थिरता आणि जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी नियमित नेतृत्व आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे.