Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

DRDA Employee Case : झारखंडमध्ये चहा पावडर व बिस्किटे घरी नेल्यामुळे शिपायाला नोकरीवरून काढण्यात आले. संबंधित कर्मचारी रणजित कुमार हिमांशू १७ वर्षांपासून DRDA बोकारो येथे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते.
DRDA office worker reinstated after Jharkhand High Court ruled that termination over minor misconduct

DRDA office worker reinstated after Jharkhand High Court ruled that termination over minor misconduct

esakal

Updated on

झारखंडमध्ये एका सरकारी कार्यालयातून चहा पावडर आणि बिस्किटे घरी नेणाऱ्या शिपायाला कामावरुन काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात दाद मागताच त्याला परत कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.झारखंड उच्च न्यायालयाने बोकारो जिल्हा ग्रामीण विकास संस्थेतील (DRDA) कंत्राटी शिपाई रणजित कुमार हिमांशू यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय रद्द केला आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले. सरकारच्या या कारवाईला असंवेदनशील आणि न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे नमूद करत, न्यायालयाने स्पष्ट केले की किरकोळ आरोपांसाठी कठोर शिक्षा देणे अयोग्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com