Court
sakal
रात्री एखाद्या महिलेच्या घरात घुसून तिचे कपडे उचलण्याचा प्रयत्न गंभीर गुन्हा असू शकतो पण त्याला बलात्काराचा प्रयत्न म्हणता येणार नाही असं निरीक्षण झारखंड हायकोर्टाने नोंदवलंय. एका २६ वर्षे जुन्या खटल्याच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने अशी टिप्पणी केलीय. महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याच्या इराद्याने ताकदीचा वापर आणि बलात्काराचा प्रयत्न यात कायद्याने फरक आहे. न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांनी निर्णय दिलाय.