
Jharkhand IED Blast
ESakal
झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यातील सारंडा जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात हेड कॉन्स्टेबल महेंद्र लस्कर शहीद झाले. या हल्ल्यात लस्कर यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन जवान जखमी झाले. त्यापैकी एक खरसावनचे आमदार दशरथ गगराय यांचा भाऊ आहे. सुरक्षा दल सध्या सारंडा परिसरात नक्षलवाद्यांवर कारवाई करत आहे.