Jharkhand Jaguar: नक्षलवाद्यांनंतर दुष्काळाशी लढा ! झारखंड जग्वारने खडकाळ माळरानावर फुलवली हिरवाई

झारखंड जग्वारच्या जवानांनी निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी . नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या झारखंड जग्वारने टेंडरग्रामच्या खडकाळ, उजाड २०० एकर परिसराला जलसंधारण व वृक्षारोपणातून हिरवागार ग्रीन कॅम्पसमध्ये रूपांतरित करत भूजलपातळी आणि पाण्याची उपलब्धता आमूलाग्र बदलली
harkhand jaguar green campus

jharkhand jaguar green campus

sakal

Updated on

नक्षलवाद्यांविरोधात घनदाट जंगलात मोहीम राबवणाऱ्या झारखंड जग्वारच्या जवानांनी आता निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टेंडरग्राम येथील एकेकाळच्या खडकाळ आणि उजाड २०० एकर परिसराचा गेल्या काही वर्षांत अक्षरशः कायापालट करण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी पूर्वी दगडांच्या खाणी होत्या आणि शेकडो फूट खोदूनही पाणी मिळत नव्हते, त्याच परिसरात आज लाखो झाडे बहरली आहेत. पावसाचे पाणी अडवण्यासाठी तलावांची निर्मिती करण्यात आली असून, भूजल पातळीतही मोठी सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दगडांच्या खाणीतून हिरव्या कॅम्पसपर्यंतचा प्रवास

झारखंड जग्वारची स्थापना २००८ मध्ये झाली. त्यानंतर टेंडरग्राम येथे या दलाला सुमारे २०० एकर जमीन देण्यात आली. मात्र, ही जमीन अत्यंत खडकाळ होती. पूर्वी या परिसरात दगडांच्या खाणीही होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com