Japanese Encephalitis: जपानी एन्सेफलायटिसमुळे १२ वर्षीय बालकाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट; काय आहेत मेंदूज्वराची लक्षणे?

Jharkhand Japanese Encephalitis, Dhanbad JE Cases, Child Death झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात जपानी एन्सेफलायटिसचे दोन रुग्ण आढळले आहेत. १२ वर्षीय कन्हाई तुरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १२ वर्षीय मोहित टुडू याला जेई संसर्गाची पुष्टी झाली आहे.
Japanese Encephalitis

Japanese Encephalitis

esakal

Updated on: 

झारखंड: झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात जपानी एन्सेफलायटिस (Japanese Encephalitis - JE) अर्थात मेंदूज्वराचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. यातील १२ वर्षीय कन्हाई तुरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आलेल्या तपासणी अहवालात जेईची पुष्टी झाली. त्यानंतर पंचेत येथील १२ वर्षीय मोहित टुडू याच्यामध्येही जेई संसर्गाची पुष्टी झाली आहे.

कन्हाई तुरी हा तेलमच्चो येथील रहिवासी होता. गंभीर लक्षणे दिसल्यानंतर त्याला शहीद निर्मल महतो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (SNMMCH) दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता आणि मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com