Jharkhand Road Accident : ऐन दिवाळीत काळाचा घाला ! स्कूटरचालकाला मदत करणाऱ्या जमावाला ट्रकने चिरडले; ७ जणांचा जागीच मृत्यू

Khunti Truck Accident : एक स्कूटरचालक पडला होता, त्याला मदत करण्यासाठी लोक जमा झाले असताना भरधाव १८ चाकी ट्रकने त्यांना धडक दिली आणि अंगावरून गेला. स्थानिकांचा आरोप आहे की चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि निष्काळजीपणे वेगाने वाहन चालवत होता
Khunti Truck Accident: Seven Dead on Karra-Torpa Road

Khunti Truck Accident: Seven Dead on Karra-Torpa Road

esakal

Updated on: 

Police Action and Hospital Treatment After Khunti Accident : झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात एका ट्रकने अनेक लोकांना चिरडले. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. ही घटना कारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एक स्कूटरचालक नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये पडला होता. त्याला मदत करण्यासाठी काही लोक तिथे जमा झाले असतानाच, भरधाव वेगाने आलेल्या एका १८ चाकी ट्रकने जमावाला धडक दिली आणि त्यांच्या अंगावरून ट्रक गेला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...