
हेमंत सोरेन यांनी गुरुवारी (२८ नोव्हेंबर) पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. रांची येथे आयोजित एका भव्य समारंभात त्यांनी राज्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेत्याची मुख्यमंत्री म्हणून ही चौथी टर्म आहे.