Jharkhand: गरज भासल्यास आमदारांना भाजपविरोधी राज्यात पाठविण्याची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jharkhand MLA

Jharkhand: गरज भासल्यास आमदारांना भाजपविरोधी राज्यात पाठविण्याची तयारी

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारवर सध्या मोठ राजकीय संकट निर्माण झालं आहे. भाजपच्या संभाव्य आमदार खऱेदीच्या संकटाला तोंड देण्यासाठी सोरेन आमदारांना भाजपविरोधी सत्ता असलेल्या राज्यात पाठविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आमदारांना पश्चिम बंगाल किंवा छत्तीगहडमध्ये पाठविले जाऊ शकते, असं सुत्रांनी सांगितलं. (Jharkhand news in Marathi)

हेही वाचा: सरकारी शाळा बघायला कधी येऊ? केजरीवालांचा भाजपशासित राज्याच्या CM ला सवाल

झारखंडमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच सोरेन यांना आमदार म्हणून "अपात्र" ठरवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी, उदयोन्मुख परिस्थितीला तोंड देण्यासाठी धोरणात्मक तयारी पाहता सत्ताधारी आघाडीच्या आमदारांच्या बैठकीची तिसरी फेरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू आहे.

सत्ताधारी आघाडीचे सर्व आमदार आपापल्या सामानासह बैठकीला उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस शनिवारी सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवणारा आदेश भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) पाठवण्याची शक्यता आहे, असे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: PM Modi : मोदींच्या वाढदिवसाला शिवराज देणार चित्ता प्रोजेक्टचं गिफ्ट, काय आहे प्लॅन?

दरम्यान काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की, "आमच्या आघाडीच्या आमदारांना छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमध्ये पाठविण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये बिगर-भाजप सरकारे आहेत. आमदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना रस्त्याने नेण्यासाठी तीन लक्झरी बस रांचीला पोहोचल्या आहेत. तसेच त्यांच्या संरक्षणात काही वाहने असतील, असही सांगण्यात आलं आहे.

आमदारांना ठेवण्यासाठी छत्तीसगडमधील बरमुडा आणि रायपूर तसेच पश्चिम बंगालमधील काही ठिकाणांसह तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. आणखी एका सूत्राने सांगितले की, "गरज पडल्यास सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी पाठवले जाईल, असही सुत्रांनी म्हटलं आहे.

Web Title: Jharkhand Preparations To Send Ruling Mlas To Bengal Or Chhattisgarh If Needed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpCongress