

Jharkhand Recruitment Exam Row Deepens As Students Remain Firm On CBI Probe Against Alleged Exam Irregularities
sakal
रांची (पीटीआय) : भरती परीक्षांतील गैरप्रकारांची सखोल चौकशी करून, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आश्वासन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिल्यानंतरही विद्यार्थी संघटना सीबीआय तपासाच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या ९८ टक्के मागण्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे, मात्र आंदोलन सुरूच राहणार असून, सोमवारी विधानसभेला घेराव घालणार आहोत, असे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे आंदोलनाचा पेच कायम आहे.