Jal Jeevan Mission: आता खेड्यातही नळाच्या पाण्यावर पाणीपट्टी, देखभाल दुरुस्तीसाठी ग्राम समित्यांकडे जमा होणार निधी

Jharkhand Water Supply : झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील २६३ गावांमध्ये नळ जोडणीसाठी दरमहा किमान ६२ रुपये पाणीपट्टी आकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Villagers in Palamu district, Jharkhand, question the monthly water tax as many households with tap connections continue to face irregular water supply.

Villagers in Palamu district, Jharkhand, question the monthly water tax as many households with tap connections continue to face irregular water supply.

esakal

Updated on: 

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या देखभालीसाठी आता पाणीपट्टी आकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील २६३ गावांमध्ये प्रत्येक नळ जोडणीसाठी दरमहा किमान ६२ रुपये पाणीपट्टी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक गावांमध्ये नळ जोडणी असूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने या निर्णयाला विरोध होत आहे. ‘आधी पाणी द्या, मगच कर घ्या’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चैनपूर तालुक्यातील भडगांवा ग्रामपंचायतीने १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणीपट्टीला मंजुरी दिली. ग्रामीण भागात पाणीपट्टी मंजूर करणारी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरल्याचे सांगितले जात आहे. पिण्याचे पाणी व स्वच्छता विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार, प्रत्येक नळ जोडणीसाठी किमान ६२ रुपये प्रतिमहिना भरावे लागतील. ग्रामसभेला हा दर वाढवण्याचा अधिकार असला, तरी तो कमी करता येणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com