
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचं निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांचं निधन झालं. तीनवेळा झारखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शिबू सोरेन यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी दिलीय.