
झारखंडमधील बरहेत येथे दोन मालगाड्यांचा मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन लोको पायलटसह तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. फरक्काहून लालमटियाला जाणारी मालगाडीने बरहेत येथे उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार टक्कर मारली ही. टक्कर खूप भीषण होती. दोन्ही मालगाड्यांचे इंजिन फुटले आणि आग लागली. दोन मालगाड्या कोळसा वाहून नेत होत्या.