

Jharkhand Tribal Woman Alleges Assault by Police Personnel
esakal
झारखंडमध्ये एका धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. एका आदिवासी महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्ला केला एवढेच नाही तर तिला उलटे टांगून तिच्या लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. हल्ल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेतली असून, लातेहार पोलिसांना त्वरित तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.