
नवी दिल्लीः पैसा कमावण्याचे पारंपारिक स्त्रोत सोडून लोक आधुनिक मार्गाकडे वळत आहेत. सोशल मीडियातून पैसा कमावणं आता फार अवघड राहिलेलं नाही. नाना तऱ्हेचे विषय घेऊन लोक सोशल मीडियात वावरत असतात. मनासारखं जगताही येतं आणि प्रसिद्धीही मिळते.. महत्त्वाचं म्हणजे पैसा. यातून पैसा मिळू शकतो, हे आता युजर्सना माहिती झालेलं आहे. एका ट्रक ड्रायव्हरने यूट्युबच्या माध्यमातून चक्क ४० लाख रुपयांची कमाई केली आहे.