Jio Platforms IPO: ‘जिओ’च्या आयपीओचा नवा विक्रम; पहिल्याच दिवशी शंभर मिनिटांत शंभर टक्के बोली, संस्थात्मक गुंतवणूकदारांची ९ पट बोली

Jio IPO Receives Three Times Overall Demand on the First Day: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओची बाजारात धूम; १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन
Jio Platforms IPO News Institutional Investors Bid Nine Times Their Reserved Quota as the Reliance IPO Sets a New Record

Jio Platforms IPO News Institutional Investors Bid Nine Times Their Reserved Quota as the Reliance IPO Sets a New Record

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्मच्या आयपीओने पहिल्याच दिवशी अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण शंभर टक्के बोली मिळवून नवा विक्रम नोंदवला आहे. हा देशातील सर्वांत वेगवान बोली लागलेला पहिला आयपीओ ठरला आहे. या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ३०,२१३ कोटी रुपयांच्या आयपीओला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याआधी बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओला पहिल्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण बोली लागली होती. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या २०२५ मध्ये आलेल्या आयपीओसाठी पहिल्याच दिवशी पूर्ण बोली लागली होती. मात्र, जिओ प्लॅटफॉर्मने अवघ्या १०० मिनिटांत हा टप्पा गाठला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com