esakal | रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी; मांझी यांच्या पक्षाचे पंतप्रधानांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

ram vilas paswan

‘हम’चे राष्‍ट्रीय प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना लक्ष्य करीत मांझी यांची ही खेळी खेळली असल्याचे मानले जात आहे.

रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी; मांझी यांच्या पक्षाचे पंतप्रधानांना पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा -  बिहारमध्ये तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराने वेग पकडला आहे. उमेदवार एकमेकांवर वैयक्तिक टीका करीत असतानाच माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे सहयोगी असलेले दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘हम’चे राष्‍ट्रीय प्रवक्ते डॉ. दानिश रिजवान यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना लक्ष्य करीत मांझी यांची ही खेळी खेळली असल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, देशातील मोठे नेते व आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे कार्यकर्ते अजूनही दुःखात आहेत. संपूर्ण देशात शोक व्यक्त होत असताना लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान हे वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशीच एका चित्रीकरणात हसत असत असल्याचे दिसले असून ते सतत चित्रीकरणाबद्दल बोलत असल्याचे होते.

हे वाचा - तुम्ही निवडणूक आयोग आहात की पक्षाचे नेते? कमलनाथ प्रकरणावरुन कोर्टाने सुनावले​

‘हम’च्या पत्रातील सवाल
कोणाच्या सांगण्यावरून रुग्णालयाने रामविलास पासवान यांच्या प्रकृतीसंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले नाही. पासवान यांना रुग्णालयात भेटण्यास तीनच जणांना परवानी कशी मिळाली, असे सवालही पत्रात केले आहेत. पासवान यांच्या नातेवाइकांबरोबरच त्यांचे समर्थकांनाही त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, असे वाटत आहे. त्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ‘हम’ने पत्रात केली आहे.