तुम करे तो रास लीला, हम करे तो चरित्र ढीला - जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
political
politicalesakal
Summary

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने (maharashtra Government) सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशभरातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी धारेवर धरलं आहे. पाच राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. या राज्यतील बड्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. यामध्ये मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान (mp cm shivraj singh chauhan) यांनी याप्रकरणी वक्तव्य केलं असून मंत्री आव्हाड (jitendra awhad) यांनी त्याला प्रत्युत्तर दिल आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावरून ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात, मालक तुमच्या शिवराजसिंह यांच्या सरकारने देखील असांच निर्णय काही दिवसा पूर्वी मध्यप्रदेश मध्ये घेतला आहे. मग महाराष्ट्राला का बदनाम करता आहात? असा सवाल त्यांनी केला आहे. तुम करे तो रास लीला, हम करे तो चरित्र ढीला, असे चिमटा त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, वाइन (Wine) म्हणजे दारू नाही. वाईनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजप फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे म्हणत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेत भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com