
नवी दिल्ली : ‘‘तुमची नाराजी सरकारच्या विरोधात असू शकते. एका अंतराळवीराच्या विरोधात तुम्ही कसे काय नाराज असू शकता?’’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी लोकसभेत आपला उद्वेग व्यक्त केला. बिहारमधील मतदारयाद्यांच्या पडताळणीच्या (एसआयआर) मुद्यावर चर्चा घेण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दोन्ही सदनात प्रचंड गदारोळ घातला. यामुळे कामकाज वाया गेले.