
मुंबई : कापसावर लागणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाजारात जिवोरा हे नवं किटकनाशक दाखल झालं आहे. यामुळं पांढऱ्या माशा, तुडतुडे आणि मावा यांसारख्या किटकांपासून कपाशीचं संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचा दावा क्रिस्ट्ल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडनं (सीसीपीएल) केला आहे. याद्वारे क्रिस्ट्लचा कीटकनाशक पोर्टफोलिओ ७ टक्क्यांनी वाढवण्यात 'जिवोरा' मदत करणार असल्याचा कंपनीला विश्वास आहे.