
Stampede RCB Fans : रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघानं काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात १८ वर्षानंतर बंगळुरुच्या संघानं आयपीएल २०२५ची फायनल जिंकली. त्यामुळं आरसीबीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. याच उत्साहाच्याभरात आज बंगळुरुतील चेन्नास्वामी स्टेडियमवर टीमचा सत्कार समारंभ कर्नाटक सरकारनं आयोजित केला होता.
या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्टेडियमबाहेर लाखोंची गर्दी झाली होती. यात बुधवारी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ११ जणांनी आपला जीव गमावला. पण आता या चेंगराचेंगरीमागचं कारण समोर आलं आहे.