Blast in J&K: एलओसीवर खंदकात स्फोट, एक अग्निवीर ठार; 2 जवान जखमी

राजौरी भागात जवानांच्या गस्तीदरम्यान हा स्फोट झाला आहे.
J&K Encounter
J&K Encounter
Updated on

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ एका खंदकात स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात एका अग्निवीराचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. हा स्फोट अशावेळी झाला जेव्हा या भागात गस्त घालत होते. (J&K Blast in trench on LoC one agniveer killed two soldiers injured)

J&K Encounter
Ram Mandir Ravi Kishan Reaction : 'खबरदार, कुणी राम मंदिराबद्दल अपशब्द बोललं तर'..., अभिनेता रवि किशनला का आला एवढा राग?

राजौरी जिल्ह्यात घटला प्रकार

माध्यमांतील वृत्तानुसार, राजौरी जिल्ह्यातील कलाल इथं भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ पोखरा चौकीजवळ जवान गस्त घालत असताना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता खंदकामध्ये स्फोट झाला. यामध्ये एका अग्नीवीराचा मृत्यू झाला तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेची माहिती कळताच तातडीनं इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. उपचारांसाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारांनंतर एका जवानाला एअरलिफ्ट करण्यात आलं आणि त्याला उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

एक अग्निवीर ठार अन् २ जवान जखमी

पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील निवासी अग्निवीर अजय सिंह बलिदान प्राप्त झाले. जवान बलवंत यांना जखमा झाल्या आहेत. ज्यांचा इलाज उधमपूरमध्ये होत आहे. नायब सुभेदार धरमिंदर सिंह यांना छोट्या जखमा झाल्या आहेत. त्यांचा इलाज १५० जीएचमध्ये उपचार सुरु आहे.

सर्च ऑपरेशन सुरु

जम्मू जिल्ह्यातील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ संशयास्पद खंदक आढळून आले आहेत. माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमनं परिसराची घेराबंदी करुन तपासकार्य सुरु केलं. (Latest Marathi News)

चौकशीसाठी शोधकार्य करणारी कुत्री आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत मागितली. घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आलं. त्यानंतर जवळपास सहा तासांपर्यंत ही मोहित सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com