esakal | VIDEO : जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत केलं पहिल्यांदाच मतदान; मतदारांचा आनंद मावेना गगनात
sakal

बोलून बातमी शोधा

J&K

कलम 370 हटवल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर इथे पहिल्यांदाच निवडणूक होतेय. 

VIDEO : जम्मू-काश्मीरच्या स्थानिक निवडणुकीत केलं पहिल्यांदाच मतदान; मतदारांचा आनंद मावेना गगनात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

श्रीनगर : हा कोणत्याही लग्नाचा समारंभ नाहीये तर ही मतदानाचा अधिकार बजावायला मिळाल्याचा आनंद आहे. कारण यांना पहिल्यांदाच मतदान करायला मिळालं आहे. सध्या जम्मू-काश्मीरच्या डीडीसी निवडणुकीच्या (District Development Council) तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. या निवडणुकीत पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थ्यांनीही मतदान केलं आहे. मत दिल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना अक्षरश: डान्स केला आहे.

यातील एका मतदाराने म्हटलं की, 70 वर्षांहून अधिक काळ गेला पण आता आम्ही पहिल्यांदा मतदान करु शकलेलो आहोत. लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवता आल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. जम्मू काश्मीरमध्ये होत असलेली डीडीसी निवडणुक अनेक अंगाने महत्त्वपूर्ण आहे. कलम 370 हटवल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर इथे पहिल्यांदाच निवडणूक होतेय. 

अनेक समुदायातील लोकांनी केलं पहिल्यांदाच मतदान
स्थानिक निवडणुकीत अनेक समुदायांनी पहिल्यांदाच मतदान केलं आहे. यामध्ये पश्चिम पाकिस्तानमधून आलेले शरनार्थी, वाल्मीकी, गोरखा समुदायाचे लोक समाविष्ट आहेत. जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर 70 वर्षांत पहिल्यांदाच या समुदायाच्या लोकांनी स्थानिक निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावलाय. हे लोक आता फक्त जम्मू-काश्मीरमध्ये फक्त मतदानच नव्हे तर राज्यातील जमीन खरेदी करणे आणि नोकऱ्यांसाठी देखील पात्र झाले आहेत.

हेही वाचा - टीआरएस-भाजपामध्ये चुरशीची लढत; AIMIM ला तिसऱ्या स्थानी ढकललं​
तिसऱ्या टप्प्यात 33 जागांवर होतंय मतदान
डीडीसी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होत आहे. थंडीमुळे मतदानावर परिणाम झाला असून थंड गतीनेच मतदान होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की डीडीसीच्या 33 जागांसाठी मतदान होत आहे. यातील 16 जागा काश्मीर आणि 17 जागा जम्मूमध्ये आहेत.