रांचीच्या ऐतिहासिक मोरहाबादी मैदानावर आज राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांनी सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सरकार स्थापनेचे निमंत्रण राज्यपाल मुर्मू यांनी दिल्यानंतर आज सोरेन यांच्यासह मंत्र्यांनी शपथ घेतली.
पाटणा : झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज (रविवार) झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रांचीच्या ऐतिहासिक मोरहाबादी मैदानावर आज राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांनी सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सरकार स्थापनेचे निमंत्रण राज्यपाल मुर्मू यांनी दिल्यानंतर आज सोरेन यांच्यासह मंत्र्यांनी शपथ घेतली.
या शपथविधीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलीन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते.
झारखंडमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीने मोठी मुसंडी मारली होती. भाजपला येथे धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मतदारांनी सत्ताधारी भाजपला नाकारत विरोधकांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत बहाल केले.