
डावे आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये वाद : रामनवमीवरून एकमेकांवर आरोप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी मांसाहारापासून रोखल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) (JNU) डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी कावेरी वसतिगृहाच्या मेसच्या सचिवाला मारहाण केल्याचा आरोपही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. (Argument in JNU and ABVP leaders)
एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर जेएनयू कॅम्पसमध्ये गुंडगिरीचा आरोप करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या पूजेला परवानगी देत नसल्याचा आरोप एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या जेएनयू (JNU) कॅम्पसमध्ये या प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना टोला; म्हणाले, देशाचे पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच
एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी द्वेषपूर्ण राजकारणामुळे आणि फुटीरतावादी अजेंड्यामुळे कावेरी वसतिगृहात हिंसक वातावरण निर्माण केले आहे. ते मेस समितीला जेवणाचा मेनू बदलण्यास भाग पाडत आहेत. मेसशी संबंधित असलेल्यांसह डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करीत आहेत. या मेनूमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीचे कोणतेही पदार्थ घेऊ शकतात. मात्र, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करीत गोंधळ घातला. मेसच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. अभाविपच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मेस कर्मचाऱ्यांवर मांसाहार तयार करू नये म्हणून दबाव आणला, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
हे तर उजव्या हिंदुत्वाच्या धोरणांचे प्रतिबिंब
जेएनयू आणि तेथील वसतिगृहे सर्वांसाठी समान असल्याचे विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. येथे राहणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या भागातील असून त्यांची संस्कृती, खाणेपिणे वेगळे आहे. ज्याचा आदर करायला हवा. एबीव्हीपीचे (ABVP) हे पाऊल जेएनयू सारख्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष ठिकाणी वर्चस्वाचे राजकारण आणि उजव्या हिंदुत्वाच्या धोरणांचे प्रतिबिंब आहे असा आरोप करण्यात आला.
हेही वाचा: सुरक्षा दलांनी घेतला बदला; दोन्ही दहशतवादी चकमकीत ठार
फुटीरतावादी कारवायांपुढे झुकणार नाही
जेएनयू (JNU) विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांना सांप्रदायिक शक्तींविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. अशा कोणत्याही फुटीरतावादी शक्तींचा खंबीरपणे सामना केला पाहिजे आणि जेएनयू समुदायाने एकजुटीने पुनरुच्चार केला पाहिजे की अशा कोणत्याही कृत्याविरुद्ध शून्य सहनशीलता असेल. जेएनयूचे विद्यार्थी अशा फुटीरतावादी कारवायांपुढे झुकणार नाही. तसेच अशा घटनांविरोधात लढा देत राहतील, असे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.
Web Title: Jnu Abvp Argument Ramanavami Carnivory Worship Accusations Against Each Other
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..