JNU मध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा भिडल्या, अनेक जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JNU
JNU मध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा भिडल्या, अनेक जण जखमी

JNU मध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा भिडल्या, अनेक जण जखमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. मारहाणीच्या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यापीठात भाजपशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)आणि डावी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA)विद्यार्थ्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. एबीव्हीपीने आयसाच्या विद्यार्थ्यांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ही घटना रविवारी (ता.१४) रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आयसा आणि एसएफआय या विद्यार्थी संघटनांशी भाजपशी संलग्न एबीव्हीपीचे सदस्यांशी बैठकीवरुन वाद झाला. एबीव्हीपीने म्हटले आहे, की डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सदस्यांवर हल्ला केला. यात त्यांचे अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. यात विद्यार्थिनींचाही समावेश आहे. विद्यार्थी संघटनेने सांगितले, की गंभीर जखमी सदस्यांना एम्समध्ये भरती करण्यात आले आहे.

हेही वाचा: निम्म्या किंमतीत झिरो डाऊन पेमेंटवर खरेदी करा Renault Kwid

जेएनयू विद्यार्थी संघटना अध्यक्ष आयशी घोषने या घटनेबाबत ट्विट केले आहे. आयशी ट्विटमध्ये म्हणतात, एबीव्हीपीच्या गुंडांनी जेएनयूमध्ये आज पुन्हा हिंसा पसरवली. वांरवार या आरोपींनी विद्यार्थ्यांवर हिंसा केली आहे आणि कॅम्पसमधील लोकशाहीला बाधित केले आहे. यावरही जेएनयू प्रशासन आताही गप्प राहणार आहे का? गुंडांवर का कारवाई होणार नाही? एबीव्हीपीने म्हटले आहे, की तिच्या संघटनेचे काही सदस्य बैठक घेत होते, तेव्हा डाव्या संघटनेचे काही विद्यार्थ्यांनी बैठकीत अडथळा आणला. त्यानंतर मारहाणीला सुरुवात झाली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की एबीव्हीपी आणि डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली असून तपास सुरु आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. एबीव्हीपी नेता निधी त्रिपाठी म्हणाल्या , शांततेत बैठक करणाऱ्या एबीव्हीपीच्या जेएनयू कार्यकर्त्यांवर डाव्यांनी हल्ला केला आहे. एबीवीपीच्या कार्यकर्त्याचे बोट तोडले आणि दिव्यांग विद्यार्थ्यालाही मारहाण केली.

loading image
go to top