निम्म्या किंमतीत झिरो डाऊन पेमेंटवर खरेदी करा Renault Kwid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Renault Kwid
निम्म्या किंमतीत झिरो डाऊन पेमेंटवर खरेदी करा Renault Kwid

निम्म्या किंमतीत झिरो डाऊन पेमेंटवर खरेदी करा Renault Kwid

कार सेक्टरच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्व कारला दीर्घ मायलेज आणि कमी किंमतीसाठी ओळखले जाते. मात्र काही कार्स त्यांच्या स्टायलिश डिझाईनसाठी पसंत केले जातात. आम्ही बोलत आहोत रेनाॅल्ट क्विडविषयी (Renault Kwid). जी कंपनीची मायलेज देणारी स्टायलिश कार आहे. शोरुममध्ये खरेदी केल्यास तुम्हाला ४.११ लाख रुपयांपासून ५.५९ लाखांपर्यंत खर्च करावे लागेल. जर तुमच्याकडे एवढे मोठे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या ही कार निम्म्या किंमतीत खरेदीबरोरबच अनेक फायद्यांविषयी पूर्ण तपशील...

हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये Skoda ची इलेक्ट्रिक SUV कार धावेल ५२० किलोमीटर

या कारवर ऑफर दिले आहे सेकंड हँड कार्सची खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईट CAR24 ने. तिने आपल्या साईटवर ही कार लिस्ट केली असून तिची किंमत २ लाख ४५ हजार रुपये आहे. या कारविषयी वेबसाईटवर दिलेल्या तपशीलानुसार या कारचे माॅडल ऑक्टोबर २०१६ चे आहे. तिचे ऑनरशिप फर्स्ट आहे. ही रेनाॅल्ट क्विड आतापर्यंत ४२ हजार ४६६ किलोमीटर धावली आहे. तिचे रजिस्ट्रेशन हरियानाच्या एचआर २९ आरटीओ कार्यालयात नोंद आहे. ही कार खरेदी केल्यावर कंपनीच्या वतीने काही अटींसह सहा महिन्यांची वाॅरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी दिली जात आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ही कार लोनवर घ्यायची असेल तर कंपनी ती ही सुविधा देत आहे. त्यावर तुम्ही ही कार झिरो डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जाऊ शकता. रेनाॅल्ट क्विडवर मिळणाऱ्या ऑफरविषयी माहिती घेतल्यानंतर आता जाणून घ्या या कारची फिचर्स आणि स्पेसिफिकेशनविषयी...

रेनाॅल्ट क्विडमध्ये ८ इंचाचे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. जे अॅपल कारप्ले आणि अँड्राॅईड ऑटो कनेक्टशी कनेक्ट होईल. या व्यतिरिक्त कारमध्ये किलेस एंट्री, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, मॅन्युएल एसी, ड्रायव्हर सीटवर एअरबॅग्स, ईबीडी आणि एबीएससारखे फिचर्स दिले गेले आहे. कारचे इंजिन आणि पाॅवरविषयी बोलाल तर यात ९९९ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. ज्याचे दोन ट्रिम्सचे पर्याय मिळतात. इंजिन म्हणाल तर यात ०.८ लीटरचे पेट्रोल इंजिन आहे. जे ६८ पीएसचे पाॅवर आणि ९१ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर मॅन्युएल गिअरबाॅक्स दिले गेले आहे. रेनाॅल्ट क्विडच्या मायलेजबाबत कंपनीच्या दाव्यानुसार ही कार २३ किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज देते.

loading image
go to top