esakal | जेएनयु हल्ला : दिल्ली उच्च न्यायालयाची फेसबुक, व्हॉट्सऍपला नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

JNU

या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात जेएनयुतील तीन प्राध्यापकांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत हल्ला झालेल्या दिवसाचे मोबाईल व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सऍप चॅट आणि अन्य पुरावे राखून ठेवावेत असे म्हटले होते.

जेएनयु हल्ला : दिल्ली उच्च न्यायालयाची फेसबुक, व्हॉट्सऍपला नोटीस

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबुक, व्हॉट्सऍप, ऍपल आणि गुगलला नोटीस पाठवून जेटा सुरक्षित  ठेवण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात जेएनयुतील तीन प्राध्यापकांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत हल्ला झालेल्या दिवसाचे मोबाईल व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सऍप चॅट आणि अन्य पुरावे राखून ठेवावेत असे म्हटले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी या कंपन्यांना सर्व डेटा सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...

दरम्यान, हल्ल्यानंतर आज (सोमवार) प्रथमच जेएनयुतील वर्ग सुरु झाले आहेत. सात दिवसांनंतर हे वर्ग सुरु झाले असून, विद्यार्थ्यांची संख्याही मोजकीच आहे. दिल्लीबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा येण्याची नोटीस लावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मुलीची ओळख पटल्याचे म्हटले आहे. 

loading image