esakal | भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

मोदींबद्दल लोकांनी कितीही गरळ ओकली तरी ते धाडसीपणे निर्णय घेणारे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते, ते मोदींमध्ये लोकांना दिसतात.

भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कितीही गरळ ओकली तरी त्याचा फरक पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते, ते गुण लोक मोदींमध्ये पाहतात, असे भाजपचे दिल्लीचे प्रभारी श्याम जाजू यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबरोबर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा तुलना केल्याने शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत झालेल्या संत संमेलनात 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन दिल्ली भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक व सध्या भाजपवासी झालेले जयभगवान गोयल यांनी हे लिहिले आहे. भाजपने मात्र यात शिवाजी महाराजांचा कोठेही अपमान झालेला नसल्याचे सांगितले आहे. श्याम जाजू यांच्यासह माजी खासदार महेश गिरी हेही उपस्थित होते. मोदींची शिवरायांशी तुलना भाजप नेत्यांनी करण्याचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वी दिवंगत अनिल माधव दवे, योगी आदित्यनाथ, विजय गोयल आदी भाजप नेत्यांनी असा प्रकार केला होता. यावरून खासदार संभाजीराजे यांनी हे पुस्तक त्वरित मागे घेण्याची मागणी केला आहे.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा

श्याम जाजू म्हणाले, की मोदींबद्दल लोकांनी कितीही गरळ ओकली तरी ते धाडसीपणे निर्णय घेणारे नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते, ते मोदींमध्ये लोकांना दिसतात. पूर्वी शिवसेनेचे काम करणारे जयभगवान गोयल यांनी त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिले आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झालेला नाही. आम्हीही त्यांचा अपमान सहन करू शकणार नाही.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक