JNU Voilence:प्राध्यापकानेच दिली होती धमकी; जेएनयू हल्ला पूर्वनियोजितच!

टीम ई-सकाळ
सोमवार, 6 जानेवारी 2020

नवी दिल्ली JNU Voilence : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होऊ लागलयं. हल्ल्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मेसेजची आता चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. एका प्राध्यापकानेच विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेला धडा शिकवण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.

नवी दिल्ली JNU Voilence : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होऊ लागलयं. हल्ल्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मेसेजची आता चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. एका प्राध्यापकानेच विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेला धडा शिकवण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हायरल मेसेज!
जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ला होण्यापूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले काही मेसेज उघड झाल्याने हा हल्लादेखील पूर्वनियोजित होता, हे स्पष्ट झाले आहे. या कथित संशयास्पद मेसेजची चौकशी केली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणाऱ्यांशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या क्रमांकांचा गैरवापर करण्यात आला असल्याचे सांगितले. अन्य काही मंडळींनी मात्र, आम्ही गोपनीय माहिती संकलित करण्यासाठी येथे आलो होतो. नंतर आम्हाला काढून टाकण्यात आले, असे सांगितले.

आणखी वाचा - 'इतना भी मत डराओ की डर ही निकल जाये'

आईशी घोषचे आरोप 
"जेएनयू'मधील गुंडांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली विद्यार्थी संघटनेची प्रमुख आईशी घोष हिने विद्यापीठाच्या आवारात शांततेमध्ये आमचा शांती मार्च सुरू असताना हल्लेखोरांनी जाणीवपूर्वक मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुखवटाधारी 20 ते 25 जणांनी या शांती मोर्चामध्ये व्यत्यय आणत विद्यार्थ्यांना लोखंडी सळयांनी मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये आपण नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. आमची विद्यार्थी संघटनादेखील यात सहभागी झाली होती. तेव्हा एका प्राध्यापकाने मला धडा शिकवण्याची धमकी दिली होती, असे तिने सांगितले. डाव्या विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठातील सेमिस्टर नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. एक जानेवारी रोजी सुरू झालेली ही नोंदणी प्रक्रिया पाच रोजी संपुष्टात आली आहे. 

विद्यापीठाच्या आवारामध्ये काही अनोळखी लोक जमा झाले असल्याची पूर्वकल्पना आम्ही पोलिसांना दिली होती. पण, त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. विद्यापीठ शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात आम्ही शांततेत आंदोलन करीत होतो. पण, त्यामध्ये व्यत्यय आणण्यात आला.
- आईशी घोष, विद्यार्थी संघटनेची प्रमुख 

जामिया मिलियाच्या आंदोलनातून सरकारने कसलाही धडा घेतलेला नाही. "जेएनयू'मधील विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आवाज उठविल्याने त्यांना शिक्षा करण्यासाठी त्यांच्यावर हा क्रूर हल्ला घडवून आणण्यात आला. या घटनेनंतर केंद्रीय मंत्री हे अगदी हताशपणे ट्विट करताना दिसले. या गुंडांना पोलिसांनी पाठबळ का दिले, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे.
- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख, एमआयएम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jnu violence was planned social media messages delhi police inquiry