JNU attack : 'इतना भी मत डराओ के डर ही निकल जाये'

Article on JNU attack by Harshada Kotwal
Article on JNU attack by Harshada Kotwal

15-12-2019 : दिल्ली पोलिसांची जामीया मिलिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण.

दिल्ली पोलिस : हिंसा थांबवणं आमचं कर्तव्य होतं. 

5-1-20 : JNUमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असताना पोलिस गेटवर फक्त उभे राहिले. 

दिल्ली पोलिस : आम्ही परवानगीची वाट पाहत होतो. 

''देशवासियों आप क्रोनोलॉजी को समझीये...'' 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) काल झालेला हल्ला हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना केल्याची सर्वत्र चर्चा आहे. असं जर खरंच असेल तर या हल्ल्यानंतर चार प्रश्न उपस्थित होतात ज्यांची उत्तरं सर्वांना मिळायलाच हवीयेत. 

1. JNU मधील विद्यार्थांवर हल्ला होत असताना दिल्ली पोलिस फक्त बघत का बसली?
2. हा हल्ला होत असतानाच परिसरात सर्व लाईट कशा गेल्या?
3. जवळपास 50हून अधिक मुलं हत्यारं घेऊन विद्यापीठात आली कशी?
4. तब्बल तीन तास ही मुलं मास्क घालून विद्यापीठात धुडगूस घालत होती तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होता त्यांना जाऊन का देण्यात आलं?

आज सकाळी पोलिसांनी आम्हीच कसे बरोबर असे सांगताना एक निवेदन जाहीर केलं. ज्यात म्हटलं आहे, ''आमच्याकडे खूप तक्रारी आल्या होत्या त्यामुळे आम्ही एकत्रितपणे एकच केस फाईल केली आहे.'' तसेच मास्क घालून हल्ला करणाऱ्या काही जणांची ओळख पटली आहे असेही दिल्ली पोलिसांनी सांगितले. मात्र, अजून त्यातल्या एकालाही अटक झालेली नाही. 

एक हजार एकरमध्ये परसलेल्या या विद्यापीठात प्रत्येक गेटवर सुरक्षारक्षक तैनात आहेत. ज्यांचे कामच गेटमधून गाडीवर किंवा चालत आतबाहेर करणाऱ्या प्रत्येकाचा रेकॉर्ड ठेवणं आहे. 50हून अधिक मुलं, मास्क घालून विद्यापीठात आली कशी हा मुळ प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. जर ही मुलं आत येताना दिसली तर त्यांना थांबविण्यात का आलं नाही? हल्लेखोरांनी प्रत्येक ह़ॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थांना आणि शिक्षकांना शोधून शोधून मारहाण केली आहे असं समजतंय.

रविवारी संध्याकाळी 6.45च्या दरम्यान विद्यापीठातील बसस्टॉपजवळ हातात काठी, लोखंडाचे रॉड घेऊन जाणाऱ्या काहींचे फोटो टिपले गेले आहेत. आतमध्ये हा हल्ला सुरु असताना पोलिसांनी विद्यापीठाकडे जाणारे सर् रस्ते बंद केले त्यामुळे आतमध्ये काय सुरु आहे हे कोणालाच कळले नाही. महिला आणि शिक्षकांना मारहाण करता यावी म्हणून रस्त्यावरील लाईट घालविण्यात आल्या का? असही प्रश्न आता पडतोय. 

दिल्ली निवडणूका आता जवळ आल्या आहेत. अशी चर्चा आहे की भाजपच्या स्वत:च्या सर्व्हेनुसार त्यांना दिल्लीत 10पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत.  यासर्व प्रकरणामुळे त्या पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता होती मात्र, आज दिल्ली निवडणूकांच्या तारख्या जाहीर होणार आहेत. 

हे तेच पोलिस होते ज्यांनी जामीयामध्ये शिरुन मारहाण करण्यापूर्वी आणखी एकदा विचारही केला नव्हता. आज याच पोलिंसासमोर विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार सर्वांवर हल्ला केला गेला. ऍम्ब्युलन्सला आता जाण्यापासून रोखलं गेलं. यांनी मात्र, यावेळी शांतेतेचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या समोर लोकं जीवासाठी ओरडत होती मात्र, ते फक्त बघत राहिले. 

आता 'रंग दे बसंती' मधील एकच डायलॉग आठवतो,
जो खून अब नही खोला वो खून नही पानी है,
जो देश के काम ना आये वो बेकार जवानी है!

(फोटो- विभु ग्रोव्हर)

लेखातील मते लेखिकेची असून सकाळ त्यांच्याशी सहमत असेलच असे नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com