
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील कद्दर भागात लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. यामध्ये सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना संशयित दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. यानंतर बुधवारी रात्री जिल्ह्यातील बेहीबाग भागातील कद्दर येथे नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. ते म्हणाले, शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले.