
उत्तर प्रदेशात एका पत्रकार पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असून पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.