मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह, आता काय?

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

भोपाळमधील कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित त्या पत्रकाराची मुलगी पण कोरोना सकारात्मक आढळली आहे. यामुळे संपर्कात येणाऱ्या सर्व पत्रकारांना क्वारंटाईनला जावे लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आता सर्वच पत्रकारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

भोपाळमधील कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित त्या पत्रकाराची मुलगी पण कोरोना सकारात्मक आढळली आहे. यामुळे संपर्कात येणाऱ्या सर्व पत्रकारांना क्वारंटाईनला जावे लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पत्रकार परिषदेत हजर असलेल्या नेत्यांची यादी प्रशासनाकडूनही घेतली जात आहे, जे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या सर्व पत्रकारांची तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कमलनाथ यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कमलनाथ स्वतः क्वारंटाईन करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी भोपाळ येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत भोपाळच नव्हे तर दिल्लीतील पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे या सगळ्या पत्रकारांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist who attended Kamal Nath press conference on March 20 found coronavirus positive