भाजप अध्यक्ष नड्डा यांचा केजरीवालांवर हल्ला; दिला कोर्टात जाण्याचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

J P Nadda attack on Arvind Kejriwal

भाजप अध्यक्ष नड्डा यांचा केजरीवालांवर हल्ला; दिला कोर्टात जाण्याचा सल्ला

J P Nadda attack on Arvind Kejriwal नवी दिल्ली : कथित दारू घोटाळ्यावरून दिल्लीत गदारोळ सुरू असतानाच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री या प्रकरणाची दिशाभूल करीत आहे. ते दारू धोरणावर उत्तर देत नाही’, असे जेपी नड्डा म्हणाले. नड्डा यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आणि एजन्सींना जाब विचारला.

केजरीवाल साहेबांनी दारू धोरणावर अद्याप उत्तर दिलेले नाही. कधी म्हणतात आम्हाला आत टाकायचे आहे तर कधी म्हणतात की ते आम्हाला त्रास देत आहेत. अरे भाऊ राज्याचे नुकसान झाले आहे. एवढा मोठा घोटाळा झाला. प्रत्येकाने आकड्यासह सांगितले. तुम्ही इकडचे तिकडचे बोलू नका. तुम्ही दिशाभूल का करीत आहात, असे त्रिपुरातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा (JP Nadda) म्हणाले.

हेही वाचा: देशात दररोज होतात इतक्या आत्महत्या; महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर? NCRB चा अहवाल

‘ही कायद्याची भूमी आहे. कायद्याच्या तरतुदी आहेत. त्यांचा वापर करा. प्रत्येक माणूस म्हणतो की मी निर्दोष आहे. तुम्ही कोर्टाचा आश्रय घ्या’, असेही नड्डा म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) भाजपवर त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत असताना नड्डा यांनी हे वक्तव्य केले आहे.

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यानंतर त्यांनी आरोप केला की, भाजपने मला आप तोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. आपच्या इतर काही आमदारांनीही धमक्या देऊन तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Jp Nadda Arvind Kejriwal Chief Minister Attack Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..