esakal | कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय जखमी; बुलेटप्रुफ वाहनामुळं वाचलो : जेपी नड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

 jp nadda, attack kailash vijayvargiya ,mukul roy , bjp

या हल्ल्यात मुकुल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय यांना दुखापत झाली असून ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.  

कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय जखमी; बुलेटप्रुफ वाहनामुळं वाचलो : जेपी नड्डा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. या हल्ल्यामध्ये  विजयवर्गीय आणि मुकुल रॉय यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. विजयवर्गीय यांच्या वाहनाच्या काचा फोडण्याचा प्रकार समोर आलाय.  विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. टीएमसीच्या गुंडांनी भाजप नेत्यांवर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केलाय. हा हल्ला लोकशाहीला लाजविणारा आहे, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.  

या प्रकरणानंतर जेपी नड्डा यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. आमच्या ताफ्यातील एकही वाहन असे नाही की ज्यावर हल्ला झाला नाही. बुलेटप्रुफ कार होती म्हणून वाचलो. पश्चिम बंगालमध्ये असहिष्णुतेचे वातावरण आहे, याचेच हे उदाहरण आहे.  या हल्ल्यात मुकुल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय यांना दुखापत झाली असून ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.  

बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्यावर हल्ल्याची योजना ? भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले पत्र

काय आहे नेमक प्रकरण?

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. डायमंड हार्बल जवळ जेपी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनावर हल्ला करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना काठीने मारहाण देखील करण्याचा प्रकार घडला. भाजप नेता कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहनावर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. ते आपल्या गाडीतून दक्षिण परगनाच्या दिशेने चालले होते. आंदोलनकर्त्यांनी  डायमंड हार्बर परिसरात त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. हा परिसर  ममता बनर्जी यांचे भाच्चे अभिषेक बनर्जी यांच्या मतदार संघात येतो. 

loading image