esakal | जे. पी. नड्डा : चाणाक्ष व्यूहरचनाकार, संघटक
sakal

बोलून बातमी शोधा

JPNadda

जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी.

जे. पी. नड्डा : चाणाक्ष व्यूहरचनाकार, संघटक

sakal_logo
By
सकाळ संशोधन आणि विकास विभाग

    शिक्षण - बीए, एलएलबी, पाटण्यातील सेंट झेवियर्स शाळेतून शालेय शिक्षण, पाटणा आणि हिमाचल विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण. 

मंत्रिपदाची कारकीर्द - आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री (पदभार घेतला ९ नोव्हेंबर २०१४). हिमाचल प्रदेशातून राज्यसभा सदस्य (सदस्यत्व स्वीकारले ३ एप्रिल २०१२). हिमाचल प्रदेशचे पर्यावरण, वने, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (१९९८-२००३). बिलासपूरमधून हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य (२००७-२०१२). 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्नी - डॉ. मल्लिका नड्डा. इतिहासाच्या प्राध्यापक, 

अभाविपच्या पदाधिकारी. उभयतांना दोन मुले. सासू - बिलासपूरच्या माजी खासदार जयश्री बॅनर्जी.

२ डिसेंबर १९६० रोजी पाटण्यामध्ये जन्मलेल्या नड्डांनी सिमल्यातून एलएलबीची पदवी संपादली. विद्यार्थिदशेतच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९३ मध्ये ते विधानसभेवर निवडले गेले. १९९८ मध्ये फेरनिवड झाली. ते आरोग्यमंत्री बनले. २००७ मध्ये ते प्रेमकुमार धुमल यांच्या सरकारात मंत्री झाले. २०१२ मध्ये त्यांनी निवडणूक रिंगणात उतरणे टाळले. पण, राज्यसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये ते आरोग्यमंत्री झाले. अमित शहा गृहमंत्री झाल्यावर नड्डांच्या खांद्यावर भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा.

शहा यांच्या तोडीस तोड संघटनकौशल्य असलेले नड्डा व्यूहरचनात्मक चाली रचून यशस्वी करण्यात माहीर आहेत. भाजपच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांत त्यांचे योगदान राहिले आहे. नड्डांनी १९७५ मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधातील संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. ‘अभाविप’तील सहभागानंतर नड्डांनी भाजपच्या युवक आघाडीत सक्रिय सहभाग घेतला. क्रीडापटू नड्डांनी दिल्लीत झालेल्या पोहण्याच्या स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे वडील नरेन लाल नड्डा पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू होते.  

सत्ताधारी काँग्रेसविरोधात राष्ट्रीय संघर्ष मोर्चा स्थापन केल्याबद्दल नड्डांना १९८७ मध्ये ४५ दिवस स्थानबद्धतेत ठेवले होते. ते २९ वयाचे असताना १९८९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्याकडे भाजपच्या युवक आघाडीतील महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी होती. नंतर तीनच वर्षांनी, एकतिसाव्या वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. हिमाचल विधानसभेचे ते तीनदा सदस्य. 

हिमाचल प्रदेशचे वनमंत्री असताना त्यांनी वन पोलिस ठाणी निर्माण करून वनसंपदेचा ऱ्हास रोखला. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असताना (२००७-१२) २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्याशी मतभेदानंतर त्यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा (२०१०) दिला होता. 

    नड्डांसमोरील आव्हाने :  दिल्ली विधानसभेची निवडणूक. पश्‍चिम बंगाल आणि केरळ विधानसभांच्या निवडणुका.