पंतप्रधान मोदींमुळे भारताला दोन कोरोना लसी मिळाल्या : जेपी नड्डा | JP Nadda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda
पंतप्रधान मोदींमुळे भारताला दोन कोरोना लसी मिळाल्या : जेपी नड्डा

पंतप्रधान मोदींमुळे भारताला दोन कोरोना लसी मिळाल्या : जेपी नड्डा

sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

पणजी : जेव्हा कोविड (Covid) महामारीला २०२० मध्ये सुरुवात झाली, त्यावेळी एप्रिलमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. भारत आपली स्वतःची कोरोना लस विकसित करित होता. नऊ महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे (PM Narendra Modi) भारताला दोन कोरोना लसी मिळाल्या. राजकीय पक्ष येथे येऊन इतरांना सांगत होते की कोरोना लस घेऊ नका. कारण अद्यापही कोरोना लसींची चाचणी अचूक झालेली नाही, असा टोला भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी विरोधकांना लगावला. पणजी येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नड्डा पुढे म्हणाले, ते (विरोधक) त्याला मोदी लस, भाजपची लस म्हणत.

हेही वाचा: Tomato Price|पेट्रोल-डिझेलनंतर टोमॅटोने खाल्ला भाव, लोकं संतापले

आज त्या सर्वांनी कोरोना लस घेतली आहे. मी त्यांना विचारतो, मोदी लस कशी होती? आजारापासून तुम्हाला संरक्षण मिळाले का? त्यांनी लोकांची दिशाभूल केली. ज्या वेळेस ते भारतातील लोकांना विरोध करित त्यावेळेस ते पंतप्रधानांही करित आणि आता ते मत मागत असल्याचे हल्ला नड्डा यांनी विरोधी पक्षांवर चढवला आहे. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील लोकांच्या प्रगतीचे स्वप्न पाहिले होते. मला आठवते, की ते शेवटच्या क्षणी आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अटल सेतू पूलाची लाईफ सपोर्ट सिस्टिमसह पाहणी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की हाऊ द जोश, अशी आठवण नड्डा यांनी पर्रीकरांविषयी सांगितली.

loading image
go to top