Tomato Price|पेट्रोल-डिझेलनंतर टोमॅटोने खाल्ला भाव, लोकं संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tomato
Tomato Price|पेट्रोल-डिझेलनंतर टोमॅटोने खाल्ला भाव, लोकं संतापले

Tomato Price|पेट्रोल-डिझेलनंतर टोमॅटोने खाल्ला भाव, लोकं संतापले

sakal_logo
By
गणेश पिटेकर

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीनंतर आता सर्वसामान्यांना टोमॅटोच्या किंमती वाढल्याने चिंतेत टाकले आहे. देशभरात हेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात टोमॅटो ८० रुपये किलोने मिळत आहेत. दुसरीकडे दक्षिण भारतातील (South India) राज्यांमध्ये हाच दर १२० रुपये किलो आहे. कारण मोठ्या प्रमाणावर दक्षिणेतील राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे. त्याचा टोमॅटो भाववाढीवर (Tomato Price Hike) झाल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या #TomatoPrice हा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

हेही वाचा: वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे,इम्तियाज जलीलांची सरकारवर टीका

सोशल मीडिया अनेकांनी मीम्स करुन आपापला संताप व्यक्त केला आहे. दीपक यांनी विचारले, की इतका भाव का खातोय? टोमॅटो भले महाग झाले असेल! यंदा नागपुरची संत्री कवडीमोल भावाचेही राहिले नाही, असा प्रश्न शैलेश त्रिवेदी यांनी विचारला आहे.

loading image
go to top