
पंतप्रधान मोदींमुळे दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील कर कमी : जेपी नड्डा
भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वसामान्य माणसाला दिलासा देणे, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे आणि गरिबांचे सक्षमीकरणासाठी कटिबद्धतेने काम करत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी सांगितले. त्याचे एक उदाहरण आपण काल पाहिले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ६ महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकरी कर मोठ्या प्रमाणावर कमी केले असल्याचे ते म्हणाले. या सवलतीतून केंद्र सरकारवर वार्षिक एक लाख कोटी रुपयांचा भार पडेल. (JP Nadda Says, Second Time Due To Prime Minister Narendra Modi Petrol Diesel Price Come Down)
हेही वाचा: केंद्रानंतर राज्याचा मोठा निर्णय! पेट्रोल 2.8 तर डिझेल 1.44 रूपयांनी स्वस्त
मात्र यातून देशातील जनतेला त्याचा लाभ मिळेल. उज्ज्वला योजनात ९ कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना या वर्षी प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांचे अनुदान देण्याचाही निर्णय घेतला गेला आहे, असे नड्डा म्हणाले. पंतप्रधानाकडून पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याचा सर्व देशवासीयांना लाभ मिळेल. (Petrol-Diesel Price)
हेही वाचा: भाजपच्या विजयामुळे निराश झालेले लोक हिंसाचार घडवतात : जे. पी. नड्डा
जेव्हा जगात रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढत चालली आहे. अशा वेळी महागाई रोखण्यासाठी ६ महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा अबकारी कारात कपात करण्याचा निर्णय हा अभिनंदनीय असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
Web Title: Jp Nadda Says Second Time Due To Prime Minister Narendra Modi Petrol Diesel Price Come Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..